पवित्र रमजान महिन्यानिमित्त खजूर बाजारपेठेत, खरेदीसाठी गर्दी
 
                                पवित्र रमजान महिन्यानिमित्त खजूर बाजारपेठेत
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) आजपासून पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ होत आहे. उद्यापासून रोजे सुरू होणार आहे. रोजा इफ्तारसाठी महत्वाची पेंड खजूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या व्हरायटीत बाजारपेठत दाखल झाली आहे. अजवा खजूरला मोठी मागणी आहे. सरताज ट्रेडींगचे मोहंमद असलम सवानी यांनी सांगितले 65 रुपये पासून 900 रुपये किलो पेंड खजूर आमच्याकडे उपलब्ध आहे. सौदी अरेबिया व इराण देशातून हि खास खजूर आहे. अजवा,हामोनी, इराणी, सफावी, कलमी, किमीया, सुकरी, जबरी, मदीना, मदीना सफा, चटई अशा विविध प्रकारचे खजूर आमच्याकडे कमी दरात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यापासून रोजे सुरू होत असल्याने खजूर खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            