पहाटे एशियन हाॅस्पिटलच्या NICU मध्ये आग, 9 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले...!

 0
पहाटे एशियन हाॅस्पिटलच्या NICU मध्ये आग, 9 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले...!

जालना रोडवरील एशियन हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री आग; NICU मधील 9 चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले...आगीची घटना CCTV मध्ये कैद...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)- जालना रोड येथील नामांकित एशियन हॉस्पिटलमध्ये रात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. हॉस्पिटलमधील बालकांच्या NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

आग लागली त्यावेळी NICU मध्ये 9 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एशियन हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि व्यवस्थापनाने तातडीने हालचाल करत सर्व 9 चिमुकल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक उसामा अब्दुल कदीर यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्यादरम्यान आवश्यक ती मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

डॉक्टर, रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व 9 चिमुकल्यांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील संबंधित यंत्रणेकडून तपासल्यानंतर स्पष्ट होणार

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow