पाणी प्रश्नावर राजकारण पेटले, भाजपाची शिवसेना(उबाठा) वर टिका....
 
                                शिवसेनेचा पाण्यासाठी मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा - मंत्री अतुल सावे
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज), उद्या शहरात उबाठाच्या वतीने हल्लाबोल महामोर्चाचे आयोजन शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे. आता पाण्यावरुन भाजपा व शिवसेना(उबाठा) मध्ये पाण्यावरुन राजकारण पेटले आहे. शहरात मे महीन्याच्या सुरुवातीपासून उबाठाच्या वतीने लबाडांनो पाणी देता का हे आंदोलन सुरु आहे. विविध ठिकाणी आंदोलने करुन पदयात्रा काढून शिवसेनेने शहर पिंजून काढले. आज भाजपाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन उबाठावर हल्लाबोल करण्यात आला. मंत्री अतुल सावे यांनी उबाठावर टिका करत सांगितले उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाण्याची योजना रेंगाळल्याने खर्च 1600 कोटी वरुन 2700 कोटींवर गेला. समांतरचे वाटोळे चंद्रकांत खैरे खासदार असतांनाच झाला होता. हा मोर्चा चंद्रकांत खैरे विरुध्द अंबादास दानवे आहे. यांना पाण्याशी काही देणेघेणे नाही. पाण्याचे पाईपलाईनचे काम नियोजनबध्द सुरु आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवले आहे. कामाची गती सध्या वाढलेली आहे. शहरातील नागरीकांना 24 तास मुबलक पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी या योजनेचा वेळोवेळी आढावा घेत आहे. काम अंतिम टप्प्यात आले आहे. उबाठा सरकारला बदनाम करण्यासाठी हा खटाटोप करत आहे यांना शहराच्या विकासासाठी काही देणेघेणे नाही. हजारो कोटींचे नवीन उद्योग गुंतवणूक करत आहे नवीन उद्योग येथे येऊ नये यासाठी हे सरकारला बदनाम करत आहे. महाविकास आघाडीचे सरकारचे हे पाप आहे. म्हणून चोराच्या उलट्या बोंबा सारखा हा मोर्चा आहे. आंदोलनात चंद्रकांत खैरे दिसत नाही अशी टिकाही सावे यांनी पत्रकार परिषदेत केली.
खासदार डाॅ. भागवत कराड यांनी भाजपाच्या वतीने पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 1600 कोटींची योजना अतुल सावे राज्यमंत्री असताना मंजूर करुन घेतली त्यांचा पाठपुरावा केला. 822 कोटींचा मनपाचा हिस्सा राज्य सरकारने देण्यास मंजूरी दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पाण्याच्या पाईपलाईनसाठी अतिरिक्त दोनशे कोटी दिले असा पूर्ण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले याचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला. तर आमदार संजय केनेकर यांनी पाण्याचे संकट शहरावर चंद्रकांत खैरे यांच्यामुळे कसे आले याची माहिती देताना सांगितले आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. समांतरचे काय झाले कोणी घोटाळे केले. पिएमसीचा भुत कोणी आणला. बोलायला लावू नका पाण्यावर राजकारण करु नका. राज्य सरकार पाण्याचे नियोजन करत आहे. लवकरच पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल. उबाठाचे हे पाप आहे ते झाकण्यासाठी आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी लावला. यावेळी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            