पाण्यासाठी राष्ट्रवादीने केले मनपा मुख्यालयासमोर चुना लावून केले आंदोलन...!

महानगर पालिका प्रशासन मुख्य कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावला चुना.. पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन..
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) शहराच्या पाणीटंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रपवार पक्षाच्या वतीने आंदोलन करून मनपाचे गेटवर महानगरपालिकेला चुना लावण्याचे आंदोलन करण्यात आले.
गेल्या 1988 पासून सिडको शहर महानगरपालिकेला हस्तांतरित केले, त्यानंतर महानगरपालिकेने शहर वाढती लोकसंख्या बघता व आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर बघता येथे काही उपाययोजना केले नाही साधी एखादी पाण्याची टाकी सुद्धा बांधली नाही व त्याचा भुर्दंड शहरवासीयांना पडत आहे. शहतवासीयाकडून संपूर्ण टॅक्स पाणी बिल भरून घेऊन स्मार्ट सिटीच्या नावाखाली आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी व मनपा प्रशासनाने व शहरातील नागरिकांना चुना लावण्याचे काम केले.
एमजीपीच्या वतीने जे पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे ती कशी फुटते जेसीबी ड्रायव्हर मद्यपान केलेला असतो का...? त्याच्याकडे लायसन्स आहे का...? मनपा प्रशासन व एमजीपीच्या कोणी अधिकाऱ्याचे त्याच्यावर वचक आहे का...? याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने महानगरपालिकेला चूना लावण्याचे आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, कार्याध्यक्ष आशिष पवार, रवींद्र तांगडे, विद्यार्थी अध्यक्ष सुशील बोर्डे , प्रशांत जगताप युवक अध्यक्ष, आनंद मगरे, प्रकाश इंगळे, सुमित पवार, तारेक पठाण, मयूर मगरे, सतीश देशमुख, राजेंद्र चव्हाण, प्रसाद कोकाटे, मदन इंगळे, भावराव भवर, लतीफ शेख, लक्ष्मण प्रधान,अजय गाडे व आदी पदाधिकारी उपस्थित
होते.
What's Your Reaction?






