पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली सोयगाव तालुक्यातील नुकसानिची पाहणी

 0
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली सोयगाव तालुक्यातील नुकसानिची पाहणी

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली सोयगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी...

छ. संभाजीनगर (औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) सोयगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असून, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिस्थितीचा आढावा घेत बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. राज्य सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून बाधित शेतकऱ्यांनी धीर धरावा असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

सोयगाव तालुक्यातील फर्दापूर, ठाणा, वरखेडी , सोयगाव तसेच सावरखेडा, दत्तवाडी इत्यादी गाव शिवारात बाधित क्षेत्राची पाहणी करून श्री.सत्तार यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली.

   सोयगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी यंत्रणेला दिले. पंचनामा करीत असतांना एकही बाधित शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

       अस्मानी संकटाचा मुकाबला करताना सर्वांना एकजुटीने काम करावे लागणार आहे. यामध्ये सर्व विभागाच्या योग्य समन्वयातून तातडीने मार्ग काढण्यात येईल. त्यामुळे एकही बाधित व्यक्ती पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, येणाऱ्या कालावधीत अतिवृष्टी बाधित भागांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर येईल. शासनास नुकसानीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील असे श्री.सत्तार म्हणाले.

 याप्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार मनीषा मेने, नायब तहसीलदार सतीश भदाणे, कृषी अधिकारी मदन सिसोदिया, गटविकास अधिकारी दादाराव आहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी तात्याराव माळी, जलसंधारण विभागाचे सूर्यकांत निकम, मुख्यमंत्री सडक योजनेचे उमेश लिंभारे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे राजेश राजगुरू, दीपक मोगडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुभाष सोनवणे, आदिंसह अधिकारी, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow