पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती मोहिमेस प्रारंभ
 
                                पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती मोहिमेस प्रारंभ
औरंगाबाद,दि.11(डि-24 न्यूज) येथील 109-पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर मतदान जनजागृती व ईव्हीएम मतदान यंत्र हाताळणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे, असे तहसिलदार श्रीमती पल्लवी लिगदे यांनी कळविले आहे.
तहसिल कार्यालय छत्रपती संभाजीनगर, निवडणूक विभागाकडून रविवारी (दि.10) रोजी मतदान जनजागृती व ईव्हीएम मतदान यंत्र हाताळणी बाबत जनजागृती मोहीम प्रारंभ करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा व लोकसभा मतदारसंघात तसेच तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदान जनजागृती व ईव्हीएम मतदान यंत्र हाताळण्याची मोहीम उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, तहसिलदार मुनालोड तसेच तहसिलदार श्रीमती पल्लवी लिगदे यांच्यासह निवडणूक विभागातील नियुक्त कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष मतदारांना मतदान यंत्र हाताळण्यासंदर्भात, व्हीव्हीपॅट बाबतमाहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन केले. ही मोहीम दि.29 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्या येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागातील नायब तहसिलदार तसेच सर्व पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच मास्टर ट्रेनर्स प्रयत्नशील आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            