पैठण गेट अतिक्रमण कारवाईमुळे सात हजार लोक झाले बेरोजगार, अधिवेशनात आवाज उठवणार - आमदार साजिद पठाण

 0
पैठण गेट अतिक्रमण कारवाईमुळे सात हजार लोक झाले बेरोजगार, अधिवेशनात आवाज उठवणार - आमदार साजिद पठाण

पैठण गेटवर अतिक्रमण कारवाईने सात हजार लोकांना बेरोजगार केले, अधिवेशनात आवाज उठवणार - आमदार साजिद पठाण

रस्त्याच्या अतिरिक्त अतिक्रमण पाडल्याचा आरोप, मनपा 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- काही दिवसांपूर्वी पैठण गेट परिसरातील मोबाईल मार्केटवर मनपाचा बुलडोझर चालला. या अतिक्रमण कारवाईत 118 दुकाने व अन्य मालमत्ता पाडण्यात आले. या कारवाईनंतर काँग्रेस अक्रामक झाली आहे. अकोला येथील काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांनी आज सायंकाळी पैठण गेट येथे भेट देऊन बाधित मालमत्ताधारकांशी संवाद साधला. 9 मीटर रस्ता असताना मनपाने अतिरिक्त अतिक्रमण पाडल्याचा आरोप आमदार साजिद पठाण यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम यांच्याही दुकानांवर या कार्यवाईत बुलडोझर चालला. या कारवाईमुळे सात हजार लोक बेरोजगार झाले आहे. यासाठी आयुक्त जवाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. अल्पसंख्याक समाजाने रोजगार करावा किंवा नाही. हि कार्यवाही नियमानुसार केली आहे का...? मालमत्ताधारकांवर या कार्यवाईत अन्याय करण्यात आला आहे त्यांचा रोजगार हिरावून घेतला आहे. 8 डिसेंबरला नागपूर येथे सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे त्यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्याशी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला व झालेल्या कारवाईबाबत माहिती घेतली. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची मनपात भेट घेऊन जाब विचारला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, माजी शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, इंजिनिअर इफ्तेखार शेख, आमेर अब्दुल सलिम, इंजिनिअर शेख मोहसीन, शेख मोहसीन आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर हर्सुल येथील मालमत्ताधारक मागिल तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आमदार साजिद पठाण यांनी उपोषणस्थळी भेट घेत नागरीकांशी चर्चा केली व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दि

ले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow