पोलिस नागरीक समन्वय समिती, भाजपकडून अनोखा उपक्रम...

 0
पोलिस नागरीक समन्वय समिती, भाजपकडून अनोखा उपक्रम...

"पोलीस नागरिक, समन्वय समिती" भाजपकडून अनोखा उपक्रम....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) - 

भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर दादा शितोळे यांच्या संकल्पनेतून शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशन साठी "पोलिस नागरिक समन्वय समितीची" स्थापना करण्यात आली आहे. 

या समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहेत.

पोलीस प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यामधील संवाद साधण्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण काम करणार आहे. 

यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे.

भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री.किशोर दादा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करणार असून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पाच पदाधिकारी नेमून नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या अडी अडचणी नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद दुवा म्हणून ही पोलीस नागरिक समिती काम करणार आहे.

या समितीमध्ये एक महिला पदाधिकारी व एक वकील यांचा समावेश करण्यात आला आहे.

आज भारतीय जनता पक्ष शहर शाखा गुलमंडी मंडळा अंतर्गत असणाऱ्या सिटीचौक पोलिस स्टेशन मधील समिती गठित करण्यात आली.

समितीच्या सदस्यांनी आज सिटी चौक पोलीस स्टेशनला भेट देऊन चर्चा केली. 

शहर जिल्हाध्यक्ष किशोर दादा शितोळे यांनी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना सर्व समिती सदस्यांचा परिचय करून दिला.

आगामी काळातील सण, उत्सव साजरे करतांना सामाजिक स्वास्थ टिकवणे, पोलिसांकडून नागरिकांना सौहार्द पूर्ण वागणूक मिळणे, गुन्हेगारांवर पोलिस यंत्रणेचा वचक राहणे, छोटे मोठे वाद आपसात सामन्यवाने मिटविणे.... अश्या जनसामान्यांच्या हिताची कामे ही समिती करेल असे भाजपा कडून सांगण्यात आले आहे.

 यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस श्री.हर्षवर्धन कराड, गुलमंडी मंडळ अध्यक्ष श्री.महेश मल्लेकर,

श्री.राजेश मेहता, श्री.जगदीश सिद्ध ,श्री.प्रमोद नरवडे, श्रीमती. अपर्णा चौधरी, श्रीमती.पुनम राजपूत श्री.चेतन जागंडे सदस्य उपस्थित होते.

 पोलिस प्रशासनाने देखील भारतीय जनता पार्टीच्या या उपक्रमाचे कौतुक केले व संपूर्ण सहकार्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow