प्रशासकांनी केली विसर्जन विहीर, कृत्रिम तलावांची पाहणी
प्रशासकांनी केली विसर्जन विहीर, कृत्रिम तलावांची पाहणी...
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि. 17(डि-24 न्यूज) आज गणेश विसर्जनानिमित्त महानगरपालिका तर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत हे गणेश चतुर्थी पासून विसर्जन पर्यंत गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडावे यावर स्वतः लक्ष देत होते. त्यांनी शहरातील सर्व विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची आणि मिरवणूक मार्गाची पाहणी करून सूचना देखील दिल्या होत्या.
आज गणेश विसर्जन रोजी त्यांनी दर्गा चौक कृत्रिम तलाव, कांचन वाडी कृत्रिम तलाव, जालान नगर, शिवाजीनगर विहीर, राजीव गांधी मैदान कृत्रिम तलाव, एन-12 विहीर आणि औरंगपुरा विसर्जन विहीरची पाहणी केली आणि वर नमूद सर्व ठिकाणी व्यवस्थाची पाहणी केली.
शहानुरमिया दर्गा कृत्रिम तलाव येथे त्यांचे निदर्शनास आले की तालावापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग नाही तसेच नागरिक मुर्त्या स्वतः विसर्जित करत आहेत. त्यांनी यावेळी मार्ग व्यवस्थित करणे आणि नागरिकांकडून मुर्त्या घेऊन महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी विसर्जन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी शहर अभियंता ए.बी देशमुख, कार्यकारी अभियंता बी.डी फड व संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?