प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटनेने घाटीच्या अधिष्ठाता यांना दिले निवेदन
प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी घाटीतील अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटने तर्फे घाटीतील विविध समस्या बाबत चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष राजेंद्र पोहाल यांच्या नेतृत्वाखाली अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले. घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या निवास्थानाकडे अधिका-यांनी लक्ष देऊन सध्या निवास्थानाची डागडुजी करून फुटलेले ड्रेनेज लाईन, वाढलेली झाडे व रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट त्वरित चालू करावे. कार्यवाही करून लवकरात लवकर कामे करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नवीन टाकण्यात यावी तसचे अनुकंपा व लाडपागे समितीचे जे थांबलेले प्रकरणे आहेत ते लवकरात लवकर निकाली काढ़णे. कारण जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या व त्यांच्या पाल्यांचे हाल होत आहेत. तसेच सार्वजनिक कार्यकारी अभियंता हे आपल्या कार्यालयात सतत गैरहजर राहतात तसेच त्यांना कर्मचाऱ्यांचे निवास्थानासंदर्भात काही विचारणा केली तर ते अरेरावीची भाषा वापरतात याच्याकडेपण अधिष्ठातांनी योग्य ते निर्णय घेऊन त्यांना समझ देण्यात यावी. जेणेकरून कर्मचाऱ्यांचे अपमान होणार नाही. यांच्यासह पुढील मागण्यांचा गांभिर्याने विचार करून या मागण्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या ही अपेक्षा.
या प्रमुख मागण्या :
1. चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानाचे ड्रेनेज लाईन, स्वच्छता व रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट चालु करून देणे.
2. लाड व पागे समितीचे व अनुकंपाचे थांबलेले प्रकरण निकाली काढणे,
3.सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी
त्यांच्या ऑफिसमध्ये वेळोवेळी हजर राहावे,
निवेदन देताना
शेख आयास, विशाल चारन, अभिमन्यू करणेलु ,प्रभाकर शिवलेकर, अजय परोचा ,गौरव मगरे, आनंद दांडगे, शिवा पोहाल, उपस्थित होते.
What's Your Reaction?