फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शुभम साळवे

 0
फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शुभम साळवे

फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी शुभम साळवे

फुलंब्री, दि.22(डि-24 न्यूज) काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार मा. डॉ. कल्याण काळे यांच्या आदेशानुसार श्री.शुभम शांतीलाल साळवे यांची फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सेवादल श्री. विलास औताडे, औरंगाबाद शहराध्यक्ष युसुफ शेख, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र दादा काळे, भाऊसाहेब जगताप, सुरेंद्र साळुंखे, दिपालीताई मिसाळ, डॉ.पवनजी डोंगरे अरुण शिरसाट, वरूण पाथ्रीकर, ज्ञानेश्वर जाधव,अनिस पटेल, पप्पूराज ठुबे, राहुल सावंत, अशोक डोळस,गौरव जैस्वाल ,आतिश पितळे, सागर नागरे, अंकुश चौधरी, सुभाष पांडभरे, प्रकाश सानप, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्याध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. पक्षाने आणि वरिष्ठ नेत्यांनी जी जबाबदारी मला दिली मी ती अगदी निष्ठेने पार पाडेल, काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आणि घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्न करेल, जी जबाबदारी मला दिली त्याबद्दल पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार अशी प्रतिक्रिया शुभमने व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow