औरंगाबादेत निघाला पांढरे वादळ महामोर्चा...!

 0
औरंगाबादेत निघाला पांढरे वादळ महामोर्चा...!
औरंगाबादेत निघाला पांढरे वादळ महामोर्चा...!
औरंगाबादेत निघाला पांढरे वादळ महामोर्चा...!

औरंगाबादेत निघाले पांढरे वादळ महामोर्चा...!

एसआयटी गठीत करण्याचा निर्णय मागे घेतल्याने बंजारा समाज अक्रामक...

औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर सरकारने या घुसखोरीची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथक(SIT) नेमण्याची घोषणा सभागृहात केली होती पण तो निर्णय मागे घेतल्याने बंजारा समाज अक्रामक झाला आहे. गैर मार्गाचा वापर करून सवलती लाटणा-या लोकांपूढे लोटांगण घालून सदरील SIT गठीत करण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचा आरोप करत औरंगाबाद शहरात भव्य पांढरे वादळ महामोर्चा काढून लक्ष वेधले. 

क्रांतीचौक येथून हा महामोर्चा काढण्यात आला. हातात मागणीचे पोस्टर व पांढरे झेंडे घेऊन महीला, पुरुष व लहान मुले हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. जय सेवालाल चा जयघोष करत एसआयटी गठीत झालीच पाहिजे या घोषणा देत मोर्चा आमखास मैदान येथे जाहीर सभेत रुपांतर झाले. मोर्चाच्या मार्गावर रहदारी दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली. यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. आमखास मैदान येथे मुख्य नेत्यांची भाषणे झाली.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे या राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मुळ विमुक्त व भटक्या प्रवर्गातील त्यातल्या त्यात विमुक्त गटातील संख्येने अतिशय कमी असलेल्या राजपूत भामटा जातीच्या सवलतीवर प्रगत असलेला एक समाज जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून डल्ला मारतो आहे. त्याची झळ केवळ मुळ राजपूत भामटा जातिला बसत नसून विमुक्त जातीतील सर्वच जातींना बसत आहे.

एसआयटी गठीत करुन निर्णय मागे घेतल्याने ह्या सरकारने एक प्रकारे जात चोरांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप प्रसिध्दीपत्रकात करण्यात आला आहे. हे आता झाकून राहिलेले नाही सरकारच्या या निर्णयाविरुद्ध विमुक्त जाती समाज अक्रामक झाला असून पांढरे वादळ महामोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले आहेत.

याच बरोबर सभागृहात घुसखोरीचा प्रश्न मांडणा-या नेत्याला सातत्याने धमक्या येत आहेत. नेत्यासह बोगसांविरुध्द आवाज उठवणा-या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. जात चोर आता घातपातावर उतरलेले आहे. त्यामुळे विमुक्त जातीत होणा-या घुसखोरीला आळा घालण्यासाठी शिंदे सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलले नाही तर भविष्यात विमुक्त जातीत होणारी घुसखोरीचे प्रकरण रौद्ररूप धारण करेल व हे आरक्षण केवळ मोठ्या जातीलाच होऊन जाईल. 

शिंदे सरकारला एवढेच सांगणे आहे विमुक्त गटातील जातींचा जास्त अंत न पाहता विमुक्त जातीच्या आक्रोशाकडे संवेदनशील होऊन पहावे आणि जात चोरांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी तात्काळ एसआयटी गठीत करावी. याच सोबत जातवार जनगणना करावी नसता जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून विमुक्त जातीच्या सवलती लाटणा-यांकडे सरकारने दुर्लक्ष करणे म्हणजे दुबळ्या समाजघटकांवर अन्याय आहे. आमचा कोणत्याही जातीला विरोध नाही विरोध आहे ते गैर मार्गाचा वापर करून दुस-याच्या सवलती लाटणा-या प्रवृत्तीला. ज्या समाजाच्या जातीपुढे भामटा शब्द आहे ते त्या समाजासाठी एक प्रकारे कवच आहे. असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना सादर केले.

यावेळी राजपालसिंग राठोड, संदेश चव्हाण, अरुण चव्हाण, डॉ.अनिल साळुंखे, रविकांत राठोड, विलास राठोड, नंदूभाऊ पवार, गोरखनाथ राठोड, कांतीलाल राठोड, आत्माराम जाधव, राकेश जाधव, अमरसिंग चव्हाण, दत्ताभाऊ राठोड, अनिलभाऊ चव्हाण, मोहन राठोड, रोहिदास पवार, वैजनाथ राठोड, जय राठोड व कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow