बिडकीनमध्ये उद्या होणारा टि.राजासिह यांचा कार्यक्रम वादात, एसडिपिआयचा विरोध, अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
बिडकीनमध्ये उद्या होणारा टि.राजासिंह यांचा कार्यक्रम वादात
, एसडिपिआयचा विरोध, अपर पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन...
हेट स्पिच दिल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाई करण्याची बिडकीनच्या नागरिकांची मागणी...!
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) उद्या बिडकीनमध्ये सायंकाळी 6 वाजता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास हैदराबादचे भाजप आमदार टी.राजासिंह हे उपस्थित राहणार आहे. परंतु त्यांचा कार्यक्रम आता वादात सापडला आहे कारण या कार्यक्रमास एसडीपीआय ने विरोध केला आहे त्यांच्या हेट स्पिच वर कालच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करणारे हेट स्पिच दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत यानुसार कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावे अशी मागणी आज दुपारी निवेदनाद्वारे अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्याकडे एसडिपिआयच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांच्या नेतृत्वाखाली बिडकीनच्या नागरिकांनी केली आहे.
नेहमी टि.राजासिंह आपल्या भाषणात एका विशिष्ट समाजाचे विरोधात वक्तव्य करुन चर्चेत असतात. अनेक गुन्हे राजासिंह त्यांचेवर दाखल आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगत नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी विनंती निवेदनात केली आहे. अल्पसंख्याकांचे घर व दुकानांना सुरक्षा द्यावी अशीही मागणी केली आहे.
लांजेवार यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले तेथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे न्यायालयाचे आदेशानुसार व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. अगोदरच आयोजकांना कलम 149 नुसार नोटीस बजावली आहे. हेट स्पिच दिल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी एसडिपिआयचे प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, राष्ट्रीय सदस्य अशोक पाटील धनगावकर, बिडकीनचे डॉ.हाफीज इम्रान शेख, जब्बार खान, साजिद कुरेशी, नदीम शाह, फारुख अतार, शेख सलमान व येथील नागरीक उपस्थित होते.
What's Your Reaction?