बेगमपुरा येथे काँग्रेसच्या प्रचारार्थ खासदार डॉ. कल्याण काळे यांची पदयात्रा
बेगमपुरा येथे काँग्रेसच्या पदयात्रेत खासदार डॉ. कल्याण काळे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रभाग क्रमांक 3 काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत शेख सलिम युसुफ, कृष्णा बनकर, आस्मा खान व सविता सलामपुरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले. हि पदयात्रा बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, कुंभार गल्ली, जयसिंगपुरा, हनुमान टेकडी परिसरात काढण्यात आली.
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहात नागरीकांनी सहभाग नोंदविला. यावेळी काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष युसुफ शेख व पदाधिकारी उपस्थित होते. या पदयात्रेतमुळे काँग्रेसला बळ मिळाल्याचे चित्र आहे. याप्रसंगी डॉ कल्याण काळे यांनी प्रभागातील काँग्रेसच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले
.
What's Your Reaction?