बेपत्ता महिलेबाबत माहिती कळविण्याचे आवाहन...

बेपत्ता महिलेबाबत माहिती कळविण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज) – वेदांतनगर पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झालेल्या महिलेची माहिती कळविण्योच आवाहन वेदांत नगर पोलीसांमार्फत करण्यात आले आहे. राणीबाई सतपाल चंडलिया (वय -60 वर्षे) रा. फुलेनगर गाढे चौक स्वच्छालय जवळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि.26 रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास रिना शाम बागडी (वय 32 वर्षे) राहते घर फुले नगर गाढे चौक स्वच्छालय जवळ येथून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन वेदांत नगर येथे महिला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन याप्रमाणे-
नाव:- रिना शाम बागडी, वय 32 वर्षे रा.फुलेनगर गाढे चौक स्वच्छालय जवळ, रंग-गोरा, उंची-5 फूट, बांधा- पातळ, नाक-सरळ, डोळे-काळे, केस- लांब काळे, भाषा- मराठी, हिंदी, वाल्मीक स्पष्ट बोलते, शिक्षण –9 वी, अंगात निळ्या रंगाचा टॉप, ग्रे रंगाची लेगिन्स, पायात- सॅन्डल, सोबत सिम - 9370501935
वरील वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास वेदांत नगर पोलीस स्टेशन येथे माहिती कळवावी असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल के.पी.गुमरे मो.न.9823499253 यांनी केले आहे.
What's Your Reaction?






