भरभरून जनमत मिळाले असताना विशेष पॅकेज राज्याला मिळायला हवे होते - अंबादास दानवे
 
                                भरभरून जनमत मिळाले असताना विशेष पॅकेज मिळायला हवे होते - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)
केंद्रीय अर्थसंकल्पावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
एवढे भरभरून जनमत मिळालेले असताना मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी महाराष्ट्रासाठी विशेश पॅकेज आणायला हवे होते. मात्र दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. दुसरीकडे बिहार हे राजकीय गरज म्हणून नवे लेकरू या सरकारने मांडीवर बसवून घेतले आहे.
'प्रपोज्ड' गोष्टींवर खूप भरभरून बोलले गेले. यापूर्वी घोषित झालेल्या बाबींची स्थिती काय याच्याशी देशातील नागरिकांना अवगत करून देण्यात आलेले नाही.
मेडिकल क्षेत्रातील जागा वाढवण्याची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षकांची संख्या अपुरी आहे, हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. आणि ही संख्या वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा या अर्थसंकल्पात नाही.
बाकी राहिला विषय 12 लाखांपर्यंत आयकारातून सुटीचा, लोकसभेच्या निवडणुकीत मध्यमवर्गाने दिलेला झटका पाहता आता मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही याची कल्पना असल्याने हा निर्णय झाला आहे...! अशी प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            