भाजपा-एमआयएम आमनेसामने येत घोषणाबाजी, अक्रामक आंदोलन, शाब्दिक चकमकीच्या घटना
एमआयएम पक्षाने केले रेल्वेस्थानकावर अक्रामक आंदोलन, भाजपा-एमआयएम आमनेसामने
बंदोबस्तात तैनात पोलिसांची धावपळ... राजगौरव वानखेडे आणि डिसिपी नितिन बगाटेंची शाब्दिक चकमक... शहराध्यक्ष शिरीष बोराळकरांनी वाद मिटवला...
भाजपा एमआयएमच्या घोषणाबाजीने रेल्वेस्थानक दणाणले...
जय श्रीराम - जय हिंदूस्थान, मोदी...मोदी...जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेंगा... खासदार इम्तियाज जलील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...या घोषणाबाजी देण्यात आले.
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) आज वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनानिमित्ताने औरंगाबाद रेल्वेस्टेशन सजले होते पण उद्घाटनाअगोदर भाजपा व एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने दोन तास वातावरण तापले होते. बंदोबस्तात तैनात पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
सकाळी 11 वाजेच्या दरम्यान खासदार इम्तियाज जलील आपल्या कार्यकर्त्यांसोबत रेल्वेस्टेशन प्रवेशद्वारावर आले असताना पोलिसांनी त्यांना रोखले त्यामुळे खासदार संतापले. कार्यक्रमस्थळी आपण एकटे जावे अशी विनंती पोलिसांनी केली. खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले उशिरा रात्री कार्यक्रम पत्रिकेवर माझे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड यांचे नाव आलेले आहे आम्हाला वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत करायचे आहे आम्हाला जाऊ द्या तरीही पोलिस रोखत असताना खासदार व एसिपि देशमुख यांची शाब्दिक चकमक झाली त्यानंतर त्यांनी रस्त्यावर बसू असा इशारा दिला त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसोबत आत प्रवेश केला तेव्हा भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, हर्षवर्धन कराड, राजू शिंदे, जालिंदर शेंडगे, सलिम चिश्ति, अब्दुल हफीज, माधूरी अदवंत व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मोदी..मोदी...देश का नेता कैसा हो मोदी जैसा हो...जय श्रीराम...दुसरीकडून एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... इम्तियाज जलील जिंदाबाद, हिंदूस्थान जिंदाबाद घोषणा सुरू केल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वातावरण तापले. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. खासदार इम्तियाज जलील यांना वेटींग रुममध्ये नेण्यात आले. तरीही घोषणाबाजी सुरू होती. महीला शहराध्यक्ष मोनिका मोरे यांनी यावेळी नाराजी व्यक्त करत भाजपाच्या वतीने सुरू केलेल्या घोषणाबाजी वर नाराजी व्यक्त केली. खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत मराठवाडा रेल्वेचे प्रश्न उपस्थित केले आहे त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवरुन वगळण्यात आले याबाबत नाराजी व्यक्त करत भाजपावर टिका केली. त्यांना महीला पोलिसांनी बाहेर नेले व एमआयएम कार्यकर्त्यांना तणाव वाढू नये म्हणून प्रवेशद्वाराबाहेर आणले. कार्यकर्त्यांनी भाजपा व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. वंदे भारत एक्स्प्रेसचे चालकाचा आम्हाला स्वागत करायचे आहे अशी विनंती शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी पोलिसांकडे केली. वातावरण खराब होऊ नये यासाठी त्यांना परवानगी नाकारली. माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, युवा शहराध्यक्ष मोहंमद असरार, वाजेद जागिरदार, मोनिका मोरे संतापले व ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर पुन्हा ते प्रवेशद्वारासमोर आले व आत जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी डिसिपि नितीन बगाटे यांनी भाजपचे माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांना धक्का देत आत जाण्याचे सांगताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वानखेडे यांनी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना घेऊन आले. त्यांनी समजूत काढून वाद मिटवला. एमआयएमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नेऊन पुढील कारवाई केली आणि सोडून दिले. यावेळी डिसिपी नितिन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा सकाळपासून तैनात करण्यात आला होता. यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमण झाले व हजारो उपस्थितांनी या नवीन रेल्वेचे स्वागत केले यानंतर हि गाडी मुंबईकडे रवाना झाली.
खासदारांचा इशारा...तर जवाबदारी पोलिसांची ...
रेल्वे भाजपाची जहांगिर नाही, भाजपाचे कार्यकर्ते मोदी मोदी घोषणा देत आहे तर एमआयएमच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढून ताब्यात घेतले जात आहे ही दादागिरी आहे. हा भाजपाचच कार्यक्रम आहे का...? भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात नाही आमच्यावर कार्यवाही केली जाते. मी मराठवाडा रेल्वे प्रश्नांवर अनेकदा आवाज उठवला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ती क्लिप बघावी. आम्हाला शांतीपूर्ण आंदोलन करायचे होते. जे सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास घाबरतात त्यांना ईडी, सीबीआयचा धाक आहे मला नाही मी घाबरत नाही. दिल्लीतही प्रश्न विचारणार. आम्हाला वंदे भारत एक्स्प्रेसचे स्वागत करायचे आहे ते करु दिले जात नाही मग रस्त्यावर कोठेही गाडी अडवू असा इशारा त्यांनी
दिला.
What's Your Reaction?