मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांच्या मतदारसंघात विकास कामांचे उद्घाटन
मंत्री अतुल सावें यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन..
पूर्व मतदार संघात केले 75 लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज ) राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील गारखेड्यात विविध विकास कामांचे उद्घाटन शुक्रवारी ( 02 ऑगस्ट) रोजी संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती.
मनपा हद्दीतील वॉर्ड क्र.९४ गजानननगर अंतर्गत श्री काशीकर ते श्री.शेरे व श्री.मोरे ते श्री. उमेकर यांच्या घरापर्यंत रस्त्या, श्री. टिटवार ते श्री दातार व श्री.राजपूत ते श्री महालकर यांच्या घरापर्यंत रस्त्या तसेच श्री.हरिदास राऊत ते श्री. बळवंत जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता अशा विविध 75 लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलतांना मंत्री श्री अतुल सावे म्हणाले की, विकासाला गती देणार हे सरकार असून नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असून नागरिकांना उत्तम सेवा देण्यावर आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देखील राज्य सरकारच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामामुळे नागरिकांच्या अडचणी कमी होणून त्यांच्या येण्या जाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच येणाऱ्या कालावधी मध्ये उर्वरित रस्त्यांचे काम देखील लवकर केली जाईल अशा भावना मंत्री श्री अतुल सावे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?