मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मद्यधुंद तरुणाची दगडफेक, पोलिसांनी केली अटक

मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मद्यधुंद तरुणाची दगडफेक...?, तरुणाला अटक...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज) -
रविवारी मध्यरात्री एका तरुणाने सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मद्यधुंद अवस्थेत सौरभ अनिल घुले या आरोपीने दगडफेक व गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना गंभीर असल्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.
त्या तरुणाने संजय शिरसाट यांच्या बंगल्याच्या दिशेने दगडफेक केली अले असे बोलले जात आहे त्याने असे का केले तपासात समोर येईल. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. हल्ला करणारा तरुन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर 302 चे गुन्हे दाखल आहे. आज मुझे काम मिला है असे तो आपल्या मित्रांना सांगत होता.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले त्या तरुणाला मी ओळखत नाही परंतु तो माझ्या मतदारसंघाचा आहे. मला अनेकदा धमक्या आल्या. पण मी कधी बोललो नाही पण हे प्रकरण वेगळे आहे. आरोपी पोलिसांना धमकावत होता. अशा लोकांना जरब बसणे आवश्यक आहे. या प्रकरणी पोलिस योग्य तपास करतील. मला अधिकच्या स्वरक्षणाची गरज नाही. सिसिटीव्हि कॅमेरे बंद होते. जनरेटर सुरु करायला वेळ लागला. असे त्यांनी सांगितले.
संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिध्दांत शिरसाट यांच्या गाडीवर नोव्हेंबर महीन्यात विधानसभा निवडणुकी दरम्यान हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांच्या घरावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली.
What's Your Reaction?






