मतदार यादीवर लक्ष केंद्रित करा, भाजपाला बोगस मतांमुळे यश मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप

 0
मतदार यादीवर लक्ष केंद्रित करा, भाजपाला बोगस मतांमुळे यश मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मतदार यादीवर लक्ष केंद्रित करा, भाजपाला बोगस मतांमुळे यश मिळत असल्याचा काँग्रेसचा आरोप....

काँग्रेसचे कार्यालय सजले, इच्छुक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आले मुलाखतीला, तिकीट मिळाले नाही तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा एकदिलाने काम करण्याचा दिला कानमंत्र, काँग्रेसचे विधानसभा निवडणुक प्रभारी गुजरातचे आमदार इम्रान खेडावाला, सह प्रभारी मध्य प्रदेशचे कुणाल चौधरी यांनी घेतल्या 9 मतदार संघातील इच्छुक उमेदवारांचे मुलाखती....

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) महाविकास आघाडी एकजुटीने आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. काँग्रेसला जिल्ह्यात किती जागा मिळतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आज इच्छूकांशी संवाद साधून त्यांची बाजू वरिष्ठापर्यंत पोहोचवणार आहे. सर्वच जागेवर काँग्रेसची तयारी आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. इच्छूकांना काय वाटते त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की मतदार यादीवर निवडणूक अवलंबून असते. त्याचा बुथ लेवल एजंट यांनी दहा दिवसांत अभ्यास करावा. बोगस नावे, दुबार नावे असतील तर त्याचा अभ्यास करावा. घरोघरी जाऊन सर्वे करा. कोण आपले मतदार आहेत. कोणत्या लोकांची मते आपल्याला मिळू शकतात. जातीनिहाय मतदार किती याची माहिती काढा. बुथ कमिट्या तयार झाले आहे त्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्या. सोशलमिडीया एक्टिव्ह करा. भाजपाकडून होणा-या खोट्या प्रचाराला लोकांसमोर मांडा. भाजपा बोगस मतांवर यश मिळवत आहेत. मध्य प्रदेश, गुजरातमध्ये अनेक जागा भाजपाने बोगस मतांवर निवडून आणले. काँग्रेस विचारांची नावे वगळली जातात.

असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमेटिचे सचिव तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सह प्रभारी कुणाल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले देशात फेक नेरेटिव्ह सेट करून काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव साधला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस आरक्षण विरोधी नाही. राहुल गांधी हे जनतेचे प्रश्न लोकसभेत प्रखरपणे मांडत आहे. संविधान वाचवणे व लोकशाही बळकट करण्यासाठी ते देशभरात फिरत आहे. अशी माहिती त्यांनी दिली. इच्छूकांना यावेळी गुजरातचे आमदार तथा प्रभारी इम्रान खेडावाला यांनी मार्गदर्शन केले.

शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी प्रास्ताविक करताना औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ.कल्याण काळे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा सोडवून घेऊ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी गांधी भवन पोस्टरबाजीने सजले होते. इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत मुलाखत दिली. गांधी भवनात सकाळपासून गर्दी होती. औरंगाबाद पूर्व पासून मुलाखतीला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर निरीक्षक आमदार इम्रान खेडावाला, सह प्रभारी कुणाल चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे, शहराध्यक्ष युसुफ शेख, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश महासचिव डॉ जफर अहमद, प्रदेश सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील, जगन्नाथ काळे, जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, काँग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, अरुण सिरसाठ, अतिष पितळे, एड सय्यद अक्रम, महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, अनिस पटेल आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow