मध्य मध्ये एमआयएम जिंकता जिंकता हरली, प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा संधी
मध्य मध्ये एमआयएम जिंकता जिंकता हरली, प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा संधी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज) 107-औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएम व शिवसेनेत या मतदारसंघात काट्याची टक्टर होती. आज झालेल्या तंत्रशिक्षण संस्थेत झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना सुरुवातीला बढत मिळाली पण नंतर एमआयएमचे नसिरुद्दीन सिद्दीकी यांनी बढत घेतली तेव्हा तेच जिंकणार अशी उत्सुकता होती. नसिरुद्दीन हे शेवटपर्यंत लिड तोडणार नाही अशी शक्यता होती. परंतु शेवटच्या फे-यांमध्ये लिड तुटली व प्रदीप जैस्वाल यांनी 85459 मते घेतली व एमआयएमचे 77340 मते घेतली. 8119 मतांची आघाडी घेत प्रदीप जैस्वाल यांनी सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवला. या निवडणुकीत किशनचंद तनवानी यांची त्यांना साथ मिळाल्याने ताकत वाढली होती. विजयानंतर प्रदीप जैस्वाल व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मिळालेली मते...
शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी 85459(विजयी), दुसऱ्या नंबरवर सिद्दीकी नासेरोद्दीन यांना 77340, उबाठाचे डॉ.बाळासाहेब थोरात यांना 37098, वंचितचे मो.जावेद कुरेशी यांना 12639, मनसेचे सुहास दाशरथे यांना 1145, तिसरी आघाडीचे डॉ.प्रमोद मोतीराम दुथडे 1150, विष्णू वाघमारे 896, नदीम राणा 188, सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे मुजंमिल खान नुरुल हसन खान 318, अॅड बबनगिर उत्तमगिर गोसावी यांना 381, नवाब अहमद शेख 102, सचिन अशोक निकम 807, सुनिल भुजंगराव अवचरमल 167, सुरेंद्र दिगंबर गजभिये 151, संदीप जाधव 163, अब्बास मैदू शेख 356, कांचन चंद्रकांत जांबोटी 314, जैवंत बंडू ओक 584, हिशाम उस्मानी 468, मो.युसुफ सज्जाद खान 493, मंगेश रमेश कुमावत 103, महंत विजय आचार्यजी 151, शकील इब्राहिम सय्यद 92, सुरेश गोविंदराव गायकवाड 73, नोटा 938 मते मिळाली.
What's Your Reaction?