मनोज जरांगे पाटील यांची माजीमंत्री अमित देशमुख यांनी घेतली भेट

 0
मनोज जरांगे पाटील यांची माजीमंत्री अमित देशमुख यांनी घेतली भेट

मनोज जरांगे पाटील यांची माजी मंत्री अमित देशमुख यांनी घेतली भेट 

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन सातत्याने लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांची औरंगाबाद येथील गॅलेक्सी हॉस्पीटल येथे जावून माजी मंत्री अमित देशमुख यांनी भेट घेतली. आवश्यकतेनुसार नेहमी औषधोपचार घ्यावा, आराम करावा काळजी घ्यावी असे सांगून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचे नमूद करून राज्य आणि केंद्र शासनाने आता वेळ न घालवता लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ काळे, सिडकोचे ब्लॉक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, व अनिस पटेल

आदी पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow