मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी व शिवराळ भाषेचा वापर करू नये - सकल मराठा समाज

 0
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी व शिवराळ भाषेचा वापर करू नये - सकल मराठा समाज

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकेरी व शिवराळ भाषा वापरु नये - सकल मराठा समाज 

पत्रकार परिषदेत मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ), दि.8(डि-24 न्यूज)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे उपोषण करत असून या उपोषणाला आमच्या सर्व सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे. मात्र जरांगे पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्याबद्दल एकेरी आणि शिवराळ भाषा वापरल्याने सकल मराठा तरुणांची मने दुखावली आहेत. जरांगे पाटील यांच्या या भाषेचा आम्ही विरोध करत असून त्यांनी यापूढे आदरयुक्त भाषा वापरावी

अशी मागणी पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. 

सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे. ते शब्द देतात ते पूर्ण करतातच हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या व्यक्तीला शिवराळ भाषा व एकेरी उल्लेख करणे हे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांना शोभत नाही. चुकीचे आणि असभ्य वर्तन आणि शिवराळ भाषेचे आम्ही कदापिही समर्थन करत नाही. ज्या शिवछत्रपतीच्या स्मारका खाली बसून जरांगे उपोषण करत आहेत त्याचे तरी त्यांनी भान ठेवावे असे मत यावेळी सकल मराठा समन्वयकांनी व्यक्त केले आहे. शिवछत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात आपण राहतो आणि निश्चितच आपण शिवरायांचे विचार आणि वारसा पुढे नेण्यास बांधील आहोत. आमचा कोणत्याही उपोषणाला, आरक्षण लढाईला तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांना विरोध नाही. विरोध आहे तो त्यांच्या शिवराळ भाषेला आणि नेत्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाला. यापुढे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नये, एकेरी उल्लेख करून शिवराळ भाषा वापरू नये असे विनंती आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत सागर देवकर पाटील, सुहास बागल पाटील, पांडुरंग पाटील, विजय वाघ, मयूर पाटील, स्वराज पाटील, संतोष गावंडे, सुनील जाधव यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow