मराठवाडा व विदर्भात दुष्काळ जाहीर करा- विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

 0
मराठवाडा व विदर्भात दुष्काळ जाहीर करा- विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

मराठवाडा व विदर्भात दुष्काळ जाहीर करा- विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 25 हजार मदत व पीकविमा देण्याची मागणी

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) राज्यातील 13 जिल्हे असे आहे तेथे 40 टक्क्यांहून कमी पाऊस झाला. राज्यातील छोटे मोठे प्रकल्पात 30 टक्क्यांहून कमी जलसाठा उपलब्ध असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वाटत आहे. मराठवाडा व विदर्भात पिकांची परिस्थिती पाऊस कमी पडल्याने गंभीर आहे. शेतकरी मेटाकुटीला आले आहे त्यांना धीर देण्याची गरज आहे. सात ते आठ महिन्यांत 1655 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे. तरीही सरकार गंभीर दिसत नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मराठवाड्यात सिंचनाची परिस्थिती बिकट आहे मागच्या वेळी सरकारने 13 हजार कोटी सिंचनासाठी देण्याची घोषणा केली ते मिळाले असते तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबले असते. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाले तरीही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. मागे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 41 हजार कोटीची घोषणा केली होती ते मिळाले नाही आता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 46 हजार कोटीची घोषणा केली हे सरकार देणारे नाही तर फक्त घोषणा करणारे सरकार आहे. मराठवाडा व विदर्भात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रुपये व पीकविमाची रोख रक्कम देण्यात यावी अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पैसे मिळत नाही तेही रोखले. बंजारा समाजातील जातींमध्ये घुसखोरी केली आहे याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली मग मागे घेतली. आमची मागणी आहे आरक्षणात घुसखोरी करणा-यांवर कार्यवाही करण्यात यावी. बंजारा समाजाचे प्रश्न उपस्थित करणारे आमदार राजेश राठोड यांना सरकारने सुरक्षा प्रदान करावी अशी आमची मागणी आहे. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत जे गैरसमज होत आहे ते अगोदर दुर करावे. मुस्लिम आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठक घेत आहे हा प्रश्न विचारला असता विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. काँग्रेस आघाडीने मराठा मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला होता भाजपाने तो आरक्षण घालवले असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow