मराठा आरक्षण देता येत नसेल तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करा, वकील बांधवांची मागणी

 0
मराठा आरक्षण देता येत नसेल तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करा, वकील बांधवांची मागणी

मराठा आरक्षण देता येत नसेल तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करा..

 वकील बांधवांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण...

औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, मराठा आरक्षण देता येत नसेल तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत समस्त वकील बांधवांच्या वतीने सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी. दर दहा वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसींचा सर्वे करावा तसेच सर्वे करून प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढाव्यात. मराठा आरक्षण देता येत नसेल तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या वकील संघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या उपोषणामध्ये उच्च न्यायालयाचे वकील बांधवही सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow