मराठा आरक्षण, मंगेश साबळेंनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची
मराठा आरक्षण, मंगेश साबळेंनी जाळली तहसीलदारांची खुर्ची
फुलंब्री , दि.24(डि-24 न्यूज) मराठा आरक्षणाचे आंदोलन आता अक्रामक होत आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची तब्येत खालावत चालली आहे. सरकार मागणीकडे दुर्लक्ष करत आहे मागणी मान्य करावी. लवकर निर्णय घ्यावा म्हणून मराठा आंदोलक अक्रामक होत आहे. आज सकाळी मराठा तरुणांना सहन न झाल्याने फुलंब्री येथील तहसिलदार यांची आज खुर्ची रस्त्यावर आणून मंगेश साबळे यांनी पेटवून निषेध व्यक्त केला. खुर्ची जाळत असताना मराठा समाज जागा हो, जरांगेंच्या मागे उभे राहा, असे आवाहन साबळे करत असतानाचा व्हिडिओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे.
What's Your Reaction?