महापालिकेच्या प्रवेशोत्स कार्यक्रमात लोकप्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत...
 
                                 
महानगरपालिकेच्या सर्व शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा...
प्रवेशोत्सवाला लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती...
मनपाच्या 53 पालक अधिकारी यांनी विद्यार्थ्यांसोबत साजरा केला प्रवेशोत्सव
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या सर्व 53 शाळेत आज विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उप आयुक्त तथा विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या 53 शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. यासाठी मनपाच्या 53 अधिकारी यांची पालक अधिकारी म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली होती.
या प्रवेशोत्सव वेळी लोकप्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती होती. यात प्रमुखाने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण व दुग्ध विकास तसेच दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य डॉ.भागवत कराड, विधानसभा सदस्य प्रदीप जैस्वाल, विधानपरिषद सदस्य संजय केनेकर, माजी उप महापौर राजू शिंदे, यांची तर पालक अधिकारी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, संतोष वाहुळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा,उप आयुक्त विकास नवाळे, अपर्णा थेटे, नंद किशोर भोंबे, लखीचंद चव्हाण, अंकुश पांढरे,स्मार्ट सिटी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांचीविशेष उपस्थिती होती.
मनपा शाळेत सर्व सुविधा उपलब्ध
- मंत्री.अतुल सावे
मनपा शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी 50 लाख रु देणार
स.लोकप्रतिनिधी यांचे कडून मनपा शाळेचा गौरव...
महानगरपालिकेच्या अशोक नगर व ब्रिजवाडी या शाळेत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास तसेच दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय यांनी मनपा शाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी 50 लक्ष रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले.तसेच त्यांनी मनपा चे विद्यार्थी हे डायनामिक असून आता मनपा शाळेत सर्व सुविधा उपलब्ध आहेत असे गौरव उद्गार काढले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके व वह्या वाटप करण्यात आल्या.
मनपा के. प्रा शाळा प्रियदर्शनी इंदिरानगर...
येथे राज्यसभा सदस्य डॉ.भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. तसेच विशेष म्हणून नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांची उंटावरून फेरी मारण्यात आली.या अनपेक्षित स्वागतामुळे विद्यार्थी व पालक आनंदित झाले होते.
यावेळी विद्यार्थांनी सादर केलेल्या सिंफनी बँड चे सादरीकरण करण्यात आले.याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
मनपा के प्रा शाळा हर्सूल येथे विधानसभा सदस्य प्रदीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या पुस्तके वाटप करण्यात आले.
मनपा के प्रा शाळा इंदिरानगर बायजीपुरा या शाळेत विधान परिषद सदस्य संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
प्रवेशोत्सव मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर म्हणाले की महानगरपालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट झाल्या असून या शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कॉम्प्युटर लॅब ग्रंथालय तसेच खेळाचे मैदान हे सुद्धा उपलब्ध असल्यामुळे मनपा शाळांची पटसंख्या वाढलेली दिसून येते. या बद्दल त्यांनी मनपा आयुक्त यांचे विशेष कौतुक केले.
पालक अधिकारी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी इंदिरानगर बायजीपुरा, संतोष वाहुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी बन्सीलाल नगर , उप आयुक्त विकास नवाळे हर्सूल, अपर्णा थेटे जुबली पार्क, अंकुश पांढरे नारेगाव उर्दू,नंदकिशोर भोंबे बेगमपुरा ,लाखिचंद चव्हाण अशोकनगर येथे प्रवेशोत्सव साजरा केला. तसेच रवींद्र जोगदंड उप मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजवाडी तसेच सर्व सहायक आयुक्त आणि वर्ग दोन चे अधिकारी यांच्या हस्ते सर्व 53 शाळेत प्रवेशोत्सव हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
मनपा शाळेत पहिल्याच दिवशी 1600 प्रवेश झाले आहेत...
या कार्यक्रमास शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे ,मुख्याध्यापक संजीव सोनार, संजय मडके , तिलोत्तमा मापारी ,तसेच शिक्षक विद्यार्थी आणि पालक बहु संख्येने उपस्थित होते.
तसेच उपस्थित मान्यवर यांचे सोबत कल्याण गायकवाड. माजी नगरसेवक भगवान रगडे. मा. नगरसेवक कल्पना रगडे. गोकुळ मलके ,विशाल सानप यांची उपस्थिती होती अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            