महाविकास आघाडी विरोधात भाजयुमोने केले आंदोलन

महाविकास आघाडी विरोधात भाजयुमोने केले आंदोलन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज) आज सकाळी भाजयुमोच्या वतीने महाविकास आघाडी विरोधात क्रांतीचौकात "महाराज, आपल्या विषयी घाणेरडे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीतील लोकांना सुबुद्धी द्या" हे निषेध आंदोलन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजगौरव वानखेडे, शहर जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन कराड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
याप्रसंगी महाविकास आघाडीच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष दिपक ढाकणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादवे, मंडळ अध्यक्ष अमोल जाधव, सजन बागल, सिध्दार्थ साळवे, शंकर म्हात्रे, बाळासाहेब तांदळे, कुणाल गिल, गणेश गरंडवाल, तेजस व्यवहारे, शुभम दानवे, राहुल दांडगे, पवन सोनवणे, बाळासाहेब माडजे, सौरभ तोतरे, दिनेश चावरीया, राहुल रोजतकर, रवी रोचवानी, अजय धीवर, अमोल गोंडे, आकाश नरोडे, विजय उज्वल मगरे, सुभाष म्हेत्रे, महेश कवडे, विनोद दहिवाल व भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?






