महीला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी महीला काँग्रेसची श्रद्धांजली कार्यक्रमात मागणी...

 0
महीला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी महीला काँग्रेसची श्रद्धांजली कार्यक्रमात मागणी...

महीला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी महीला काँग्रेसची श्रद्धांजली कार्यक्रमात मागणी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)-महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार,

शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटी पूर्व विधानसभा प्रभाग क्रमांक 23, शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या महासचिव वंदनाताई जगताप यांच्या नेतृत्वात,व शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिपाली लालाजी मिसाळ

यांच्या व इतर पक्ष महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, पुंडलिक नगर येथे सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने उप पोलिस निरीक्षक यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमधून उघड झाले आहे.

या घटनेने संपूर्ण समाज हादरला असून, वैद्यकीय क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, 

पीडित महीला डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी करत मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, बबन डिडोरे, डॉ.पवन डोंगरे ,बाबुराव कवसकर, अजय दिंडोरे ,इम्रान पठाण , सागर नागरे, मयूर गायकवाड, अनुराग दाभाडे, रवी लोखंडे, इरफान पठाण, उत्तम दणके, मोईन कुरेशी, रईस शेख, शांतीलाल पवार, प्रविण केदार, योगेश थोरात, सुफीयान पठाण, शाहूराज कांबळे काका, रुबीना सय्यद ,मंजू लोखंडे, सलमा नाहीद, शहिदां खान, रेखा निकाळजे, नंदा पवार, लता अक्षय, वैशाली गोवर, ज्योती सदाशिव, नेहा पवार ,वंदना जगताप ,सोनाली काकडे ,मयुरी काकडे, मंगल सातपुते आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow