मामा बनले अनपेक्षित खासदार, औरंगाबाद मतदारसंघात फडकला शिवसेनेचा भगवा...!

 0
मामा बनले अनपेक्षित खासदार, औरंगाबाद मतदारसंघात फडकला शिवसेनेचा भगवा...!

मामा बनले अनपेक्षित खासदार, औरंगाबाद मतदारसंघात फडकला शिवसेनेचा भगवा...!

इम्तियाज जलील यांनी भुमरेंची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या....! मतमोजणी केंद्राबाहेर भाजपा शिवसेना व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात डिजेवर थिरकत विजयी जल्लोष साजरा केला..... यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला....

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज झालेल्या मतमोजणीनंतर सर्वांना परिचित असलेले मामा संदीपान भुमरे यांच्या गळ्यात खासदार पदाची माळ पडली. शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात फडकला. त्यांनी अनपेक्षित विद्यमान खासदार इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. सव्वालाखाच्या मताधिक्याने एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव केला.

संदीपान भुमरे यांना 474434 तर दुसऱ्या क्रमांकाची मते इम्तियाज जलील यांना 340877 मते मिळाली. 291870 मतांवर उध्दव गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसरखान हे 69087 मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहीले. गेल्यावेळी अपक्ष म्हणून 280000 मते घेणारे हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी फक्त 39645 मते मिळाले. बसपाचे उमेदवार 8188, अपक्ष उमेदवार सुरेंद्र गजभीये यांना 10,719, रविंद्र बोडखे 6250, अब्दुल अजीम इन्कलाब 4693, संजय सिरसाठ 3809, डॉ.जीवन राजपूत 3788, मनिषा खरात 3097, संगिता जाधव 3809, जे.के.जाधव 2916, सुरेंद्र गजभीये 2206, अर्जून गालफाडे 2185, अब्दुल समद बागवान 1478, अरविंद कांबळे 1975, एड बी.यू.गोसावी 1271, नारायण जाधव 1100, पंचशिला जाधव 1267, भारत कदम 1489, भालेराव वसंत संभाजी 1546, घुगे पुंडलिक 1870, जगन्नाथ उगले 753, देविदास कसबे 595, प्रशांत आव्हाळे 1938, भानूदास रामदास सरोदे पाटील 1102, मनोज घोडके 2582, मिनासिंग अवधेशसिंग 783, लतीफ जब्बार खान 765, विशाल नांदरकर 2132, शेख ख्वाजा किस्मतवाला 892, सुरेश आसाराम फुलारे 910, संदीप मानकर 1373, संदीप जाधव 609, त्रिभुवन मधुकर पद्माकर 593, नोटा 5729 मते मिळाली.

नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले मी अगोदरपासूनच सांगत आहे माझा मुकाबला इम्तियाज जलील यांच्याशी आहे. खैरेंशी नाही. इम्तियाज जलील चांगले माणूस आहे खैरे नाही, खैरेंनी पराभवानंतर काय करायचे त्यांनी ठरवावे की हिमालयात जायचे कि नाही. माझे पहीले प्राधान्य शहराचा पाणीप्रश्न सोडवणे व रस्ते आणि जिल्ह्याचा विकासाला प्राधान्य असणार आहे. 

इम्तियाज जलील यांनी पराभवानंतर सांगितले की जनतेने पाच वर्षांत सेवेची संधी दिली होती. मतदार संघातील जनतेने भरभरून प्रेम दिले परंतु यावेळी ते कमी पडले. का कमी पडले याची समीक्षा करावी लागेल. कोठे चुक झाली ती सुधारण्याचा प्रयत्न करत जनतेची सेवा करत राहणार.

यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, मंत्री अतुल सावे, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, मनसेचे जिल्हा प्रमुख सुमीत खांबेकर आदी उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow