मुकाती सेवा ट्रस्टच्या वतीने दिवाळीनिमित्त गरजूंना 5 हजार नवीन कपड्यांचे वाटप

 0
मुकाती सेवा ट्रस्टच्या वतीने दिवाळीनिमित्त गरजूंना 5 हजार नवीन कपड्यांचे वाटप

मुकाती सेवा ट्रस्टच्या वतीने दिवाळीनिमित्त गरजूंना 5 हजार नवीन कपड्यांचे वाटप

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 7 (डि-24 न्यूज) – दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक गरीब व गरजू कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक युसूफ मुकाती हे गेल्या 16 वर्षांपासून मुकाती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महेश नगर येथील ट्रस्टच्या कार्यालयात दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबांना ५ हजार नवीन कपडे, बूट व चप्पल यांचे वाटप करण्यात आले. प्रभागाच्या नगरसेविका संगीता नितीन सांगळे, नितीन सांगळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळपासूनच कपडे व साहित्य वाटपासाठी गरजू नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

या उपक्रमाचे विशेष म्हणजे ट्रस्टच्या वतीने शहरातील गरजू कुटुंबांचे यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर संबंधित कुटुंबांना कार्यक्रमस्थळी निमंत्रित करून त्यांना सन्मानपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने कपडे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले जाते.

यावेळी नगरसेविका संगीता सांगळे म्हणाल्या की, ज्येष्ठ समाजसेवक युसूफ मुकाती हे दरवर्षी दिवाळीनिमित्त गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. काही कुटुंबांना दिवाळीचा फराळ आणि नवीन कपडे घेणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम मुकाती सेवा ट्रस्ट करत आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी युसूफ मुकाती व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

याप्रसंगी मुकाती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष युसूफ मुकाती, नितीन सांगळे, कोषाध्यक्ष सतीश वायकोस, सचिव अमोल जैन, आशिष उगले, रोहित शर्मा तसेच ट्रस्टचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुकाती सेवा ट्रस्टच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान, मुकाती सेवा ट्रस्टच्या वतीने मुस्लिम समाजाच्या ईद सणानिमित्तही दरवर्षी हजारो गरजू कुटुंबांना मोफत कपड्यांचे वाटप केले जाते. विविध सणांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक एकता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक हो

त आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow