मुख्यमंत्र्यांना विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे आव्हान
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना दिले आव्हान
मराठवाड्यात 46 रुपयांचे काम दाखवा 1 लक्ष बक्षीस घ्या
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज) गतवर्षी संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी 46 हजार कोटी रुपयांची विकासात्मक कामांसाठी घोषणा केली होती. एक वर्षपूर्ती नंतर या घोषणा केलेल्या पैकी 46 रुपयांचे तरी काम दाखवा आणि 1 लक्ष रुपयाचे बक्षीस घ्या असे आव्हान शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या जनसंदेश संबोधात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या पैकी 29 हजार कोटींचे कामे पूर्णत्वाकडे गेले असल्याचे सूतोवाच केले. याला आव्हान देत मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामांची यादी जाहीर करावी असे, आवाहन दानवे यांनी केले.
मगील एका वर्षात मराठवाड्यात कोणत्याही प्रकारचे एकही काम मंत्रीमंडळ बैठकीत घोषित केलेल्या योजनांपैकी सुरू नाही. प्रत्यक्षात कोणीही माहिती घेऊन ही बाब तपासून बघू शकते. मुख्यमंत्र्यांनी आजच्या संबोधनात 29 हजार कोटींचे कामे सुरू असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात अशी स्थिती असेल तर राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी असे जाहीर आवाहन देऊन मी खात्रीपूर्वक सांगतो की एकही काम पुर्ण झाले नसेल अशी, टीकाही अंबादास दानवे यांनी केली.
मराठवाड्याला आताचे सत्ताधारी गृहीत धरत नसून गतकाळात याच क्रांतिकारी भूमीने मराठवाड्याला मुक्ती मिळवून दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खोटी आणि फसवणूक करणारी माहिती देऊ नये अन्यथा आपल्यालाही आगामी काळात मराठवाड्यातील जनता पाणी पाजेल अशी भूमिका, दानवे यांनी यावेळी मांडली.
तब्बल 15 हजार कोटीच्या विशेष निधीतून पश्चिम वहिनीचे पाणी वळवून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसाठी मंजूर केले होते. वर्षपूर्ती नंतर या प्रकल्पाला राज्य सरकारकडून आतापर्यंत सर्वेक्षणासाठी फक्त 60 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. अशीच या प्रकल्पाची संथगती राहिली तर पुढील दहा वर्ष हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. राज्य सरकारची या प्रकल्प बाबत भूमिका बघता पुढील 10 वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा त्यांचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टिका अंबादास दानवे यांनी केली.
What's Your Reaction?