मुसळधार पावसाचा कहेर...रेल्वे वाहतुकीवर परिणाम...
 
                                 
 
मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम : अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले
नांदेड, दि.28(डि-24 न्यूज) - हैदराबाद विभागातील भिकनूर – तळमडला तसेच अक्कनपेट – मेडक या मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून त्यामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. परिणामी काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. तसेच काही गाड्या आंशिक स्वरूपात रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
पावसामुळे दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत :
काचिगुडा – नागसरोल (17661)
काचिगुडा – नरखेड (17641)
नांदेड – मेडचल (77606)
तर 29 ऑगस्ट 2025 रोजी सुटणाऱ्या गाड्यांपैकी :
नागसरोल – काचिगुडा (17662)
नरखेड – काचिगुडा (17642) या गाड्याही रद्द राहतील.
मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या...
रेल्वे वाहतुकीवर कमी परिणाम व्हावा यासाठी काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
27 ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डी – तिरुपती (17418) ही गाडी परभणी – परळी वैजनाथ – विकाराबाद या मार्गे नेण्यात आली.
तर काचिगुडा – भगत की कोठी (17605) ही गाडी काचेगुडा – मौला अली जी – काझीपेट – पेड्डपल्ली बायपास – करीमनगर – निजामाबाद या वळण मार्गे चालविण्यात येईल.
आंशिक रद्द गाड्या
मुसळधार पावसाचा परिणाम काही गाड्यांच्या ठराविक फेऱ्यांवरही झाला आहे.
निजामाबाद – तिरुपती रायलसीमा एक्सप्रेस (12794) ही गाडी दिनांक 28 ऑगस्ट रोजी निजामाबाद – सिकंदराबाद दरम्यान आंशिक रद्द करण्यात आली आहे.
तसेच नांदेड – विशाखापट्टणम (20812) ही गाडी नांदेड – चारलापल्ली दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी आपला प्रवास निश्चित करण्यापूर्वी रद्द अथवा वळविण्यात आलेल्या गाड्यांची माहिती घेऊनच पुढील नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच पावसामुळे वाहतूक विस्कळीत होऊ शकते म्हणून प्रवाशांनी संयम व सहकार्य दाखवावे, असेही आवाहन जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.
रेल्वे हेल्प डेस्क क्रमांक ...
मुसळधार पावसामुळे गाड्यांच्या रद्द/वळविणे/आंशिक रद्दबाबत माहिती व मदतीसाठी खालील हेल्प डेस्क क्रमांकांवर संपर्क साधावा :
NANDED (नांदेड) हेल्प डेस्क – 9063430360
PARBHANI (परभणी) हेल्प डेस्क – 9063434539
नांदेड - जम्मू तावी –नांदेड हमसफर एक्स्प्रेस ची एक फेरी रद्द करण्यात आल्या बाबत
जम्मू विभागातील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या परिचालन वर परिणाम झाला आहे, यामुळे –
उद्या दिनांक 29 ऑगस्ट रोजी हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 12751 हुजूर साहिब नांदेड – जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
दिनांक 31 ऑगस्ट रोजी जम्मू तावी रेल्वे स्थानकावरून सुटणारी गाडी क्रमांक 12752 जम्मू तावी - हुजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17664 हुजूर साहिब नांदेड - रायचूर एक्सप्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकराबाद मार्गे धावेल. यामुळे या गाडीचे नांदेड ते विकाराबाद दरम्यान चे सर्व थांबेल वागळण्यात आले आहेत
दिनांक 28.08.2025 ची गाडी क्रमांक 17406 आदिलाबाद - तिरुपती एक्सप्रेस निजामाबाद-पेडापल्ली-वरंगल मार्गे वळवलेल्या मार्गावर धावेल, ती निजामाबाद आणि वरंगल दरम्यानचे सर्व थांबे वगळेल.
 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            