मोदी सरकारची यशस्वी 11 वर्ष, मराठवाडा विभागीय कार्यशाळा संपन्न

 0
मोदी सरकारची यशस्वी 11 वर्ष, मराठवाडा विभागीय कार्यशाळा संपन्न

"मराठवाडा विभागीय कार्यशाळा" 

मोदी सरकारची यशस्वी 11 वर्ष ..!!

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज)

आज भाजपाच्या वतीने "संकल्प से सिद्ध तक" मराठवाड्यातील नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष व मंडळ अध्यक्ष यांची मराठवाडा विभागीय कार्यशाळा हॉटेल हयात, छत्रपती संभाजीनगर येथे भाजपा कार्यकारी अध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या कार्यशाळेमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी आणखी बळकट करण्याच्या सह 11 वर्षांमधील मोदी सरकारचा यशस्वी प्रवास राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचावा, या दृष्टीने उपस्थित पदाधिकाऱ्यांना चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी...

भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब दादा दानवे, राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री.अतुल सावे, राज्याच्या मंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर, खासदार डॉ.भागवत कराड, भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री संजय केनेकर, विभागीय संघटन मंत्री श्री. संजय कोडगे, भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री विक्रांत पाटील , महामंत्री श्री.राजेश पांडे, आमदार श्री.बबनराव लोणीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow