मोलकरणीसाठी विना विलंब कायदा करा - सुभाष लोमटे
 
                                मोलकरणीसाठी विनाविलंब कायदा करा - सुभाष लोमटे
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)
मोलकरणीसाठी तात्काळ कायदा करावा अशी मागणी , जागतिक मोलकरणी व घरेलु कामगार दिनानिमित्त घेतलेल्या मोलकरणींच्या मेळाव्यात, असंघटित कष्टकऱ्यांचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी केली.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संमेलनात ठराव क्रमांक 189 द्वारे, मोलकरणींचे हक्कासाठी सर्व देशांनी कायदे करावेत असा ठराव 16 जून रोजी पारित केल्याने, 16 जून हा दिवस, आंतरराष्ट्रीय मोलकरणी ( International Domestic worker's Day ) दिवस म्हणून पाळण्यात येतो, असे साथी लोमटे यांनी सांगितले.
खर तर मोलकरणी या डॉक्टर, शिक्षिका, प्राध्यापक, वकील वा नोकरदार भगिनींना त्यांची नोकरी वा काम चिंतामुक्त पद्धतीने व वेळेवर करता यावे म्हणून या मोलकरणी धुणी भांडी, झाडलोट, साफसफाई, कपडे धुणे, स्वयंपाक इ. सर्व घरातील कामे करतात. त्यांचे साठी स्वतंत्र कायद्याची गरज असल्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू असून, चर्चेचे घोडे पुढे जातच नव्हते, मात्र आत्ता सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाने, मार्ग खुला झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या ठरावात मोलकरणींचे कामाचे 8 तास, वेतन निश्चिती, आठवड्याची सुटी, कष्टकरी म्हणून सामाजिक सुरक्षा, कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक नागरी सुविधा, म्हातारपणासाठी पेन्शन ची तरतूद इ. बाबींचा कायद्यात अंतर्भाव असावा असेही नमूद करण्यात आले आहे.
या दिनाचे औचित्य साधून, मोलकरणी व घरेलू कामगार संघटनेच्या वतीने इंदिरानगर गारखेडा येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आज दुपारी 3 वाजता मोलकरणींच्या मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी साथी लोमटे बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, 29 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा कायद्याची प्रक्रिया येत्या सहा महिन्यात पूर्ण करावी असे आदेश दिले होते. पण सरकारची त्या दृष्टीने फारशी हालचाल दिसत नाही, म्हणून कायद्याचे मागणीसाठी, आपण निवडूण दिलेल्या आमदार - खासदारांना भेटून निवेदन द्यावे, व लवकरात लवकर कायदा करण्याचा आग्रह धरावा असे सांगितले.
संघटनेच्या आशाबाई डोके यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात नंदाताई पाईकराव, शोभा निकाळजे, राधाबाई जगधने, रेखा सातपुते, सुंदर बाई ढलपे, प्रभा रणदिवे, इ .व साथी देविदास किर्तीशाही यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            