युवकांना खाजगी कंपनीत नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप, हिशाम उस्मानी यांच्या प्रयत्नांना यश...!
युवकांना खाजगी कंपनीत नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप...
हिशाम उस्मानी यांच्या पुढाकाराने शेकडो तरुणांना मिळाला रोजगार...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) 25 जूलै रोजी जयसिंगपुरात समाजसेवक मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय वाघमारे यांनी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात पात्र ठरलेल्या युवकांना आज खाजगी कंपनीत नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. बेरोजगारी वाढत असताना चिंतेचा विषय ठरत असताना या तरुणांच्या चेह-यावर नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर वेगळाच आनंदाचा क्षण होता. या तरुणांनी मोहम्मद हिशाम उस्मानी यांचे मनापासून आभार मानले. काही दिवसांत महीलांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष रोजगार मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम येथेच न थांबता शहरातील विविध क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय वाघमारे, मोहम्मद अश्फाक, मोहम्मद इरफान, शेख अजहर आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?