युवक काँग्रेसने पेट्रोल पंपावर केले "मेलाॅडी खाओ सब भुल जाओ" आंदोलन...!
युवक काँग्रेसने पेट्रोल पंपावर केले "मेलाॅडी खाओ सब भुल जाओ आंदोलन"...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - इंधन दरवाढीच्या विरोधात शहागंज येथील पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसच्या वतीने "मेलाॅडी खाओ सब भुल जाओ" आंदोलन केले. आठ दिवसांत चार वेळेस पेट्रोल, डिझेल व सिएनजीचे दर सतत वाढत असल्याने देशात महागाई वाढत आहे. रस्त्यावर उतरून जनतेमध्ये जावून काँग्रेस सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. मोदी एकीकडे सांगत आहेत पेट्रोल डिझेल, गोडतेलचा कमी वापर करा, घरात बसून काम करा, सोने एक वर्ष खरेदी करु नका, विदेश दौरे करु नका आणि स्वतः विदेश दौ-यावर जावून मेलाॅडी चाॅकलेट वाटत आहे आणि देशातील जनता महागाईने होरपळत आहे. बेरोजगारा वाढत आहे. देशावर आर्थिक संकट आले आहे. आता देशाला अशा संकटातून वाचवण्यासाठी काँग्रेसची गरज आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी देशभरात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. जनतेचे प्रश्न जाणून घेत आहे. ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी युवक काँग्रेसचे सह प्रभारी नवज्योत सिंह संधू यांनी आंदोलनानंतर दिली.
प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तात्काळ इंधनाची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रसंगी शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष एड सय्यद अक्रम, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव अजय डिडोर, सचिव इरफान पठाण, गुरमीत गील, दिपक कणसे, जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर नागरे, प्रदेश उपाध्यक्ष अनुराग भोयर, मोईनोद्दीन कुरेशी, रतन गुर्जर, सुमेध नारनवरे, सुफीयान पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?