राशन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची इम्तियाज जलील यांची मागणी, घेतली विधानपरिषद निवडणुकीसाठी महत्वपूर्ण बैठक...!
राशन घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची इम्तियाज जलिल यांची मागणी...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- शहरात रेशन व पोषण आहाराचा 17 लाख रुपयांचा अन्नधान्य काळ्या बाजारात जाणारे अन्नधान्य पकडले आहे. या घटनेतील तीन आरोपी अटक आहे दोन फरार झाले आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अन्नधान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या घोटाळ्यात रेशन दुकानदार, शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांची मिलिभगत आहे. मी आमदार होतो तेव्हापासून मी अन्नधान्य घोटाळ्यावर आवाज उठवला आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत पोलिस आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; हाजी इसाक खान यांना पाठिंब्याची ग्वाही
औरंगाबाद–जालना विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस एमआयएमचे 38 नगरसेवक तसेच जाफराबाद, मंठा आणि जालना येथील नगरसेवकांनी विशेष उपस्थिती दर्शविली. याशिवाय गटनेते हाजी शेर खान, विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी तसेच नासिर सिद्दीकी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी येत्या 18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपस्थित सर्व नगरसेवक व सदस्यांनी एमआयएम समर्थित उमेदवार हाजी इसाक खान यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा तसेच त्यांच्या बाजूने मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीदरम्यान इम्तियाज जलिल यांनी उपस्थित नगरसेवक व सदस्यांना हाजी इसाक खान यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तसेच विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या बाजूने मतदान करून विजय निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी संघटनेची एकजूट दाखवत हाजी इसाक खान यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त
केला.
What's Your Reaction?