रिक्षाचालकांच्या बंदला प्रतिसाद, प्रवाशांचे हाल, स्मार्ट सिटी बसला आले अच्छे दिन

 0
रिक्षाचालकांच्या बंदला प्रतिसाद, प्रवाशांचे हाल, स्मार्ट सिटी बसला आले अच्छे दिन

रिक्षाचालक मालक, वाहनांचे चालक रस्त्यावर, चक्काजाम मुळे प्रवाशांचे हाल...

शहरातील 35 हजार रिक्षा व लोडिंग रिक्षा बंद मध्ये सहभागी... स्मार्ट सिटी बसचा व्यवसाय वाढला, वाळूज पंढरपूर, सिडको बसस्थानक, रेल्वेस्टेशन, हर्सुल, जळगाव रोड, जालना रोडवर फे-या वाढल्या... खाली जाणाऱ्या सिटीबसमध्ये प्रवाशांची फुल गर्दी.... रस्त्यावर उतरून रिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन, शांततेत बंदला प्रतिसाद, बंद यशस्वी झाल्याचा दावा... शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी अंकल आले नसल्याने पालकांना मुलांना सोडावे लागले, काही विद्यार्थ्यांनी सिटीबस गाठली, जेष्ठ नागरिक व महिलांना प्रवास करण्यासाठी त्रास सहन करावा लागला तर काही पायी चालत गेले. 

औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) रात्री 12 वाजेपासून ऑटो रिक्षा चालक मालक व लोडिंग रिक्षाचालकांनी चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. रेल्वेस्टेशन, सेंट्रल बसस्थानक, सिडको बसस्थानक, जळगाव रोड, जालना रोड, हर्सुल व शहरातून प्रवास करायचा असल्यास ऑटो बंद असल्याने प्रवाशांना स्मार्ट सिटी बस पर्याय असल्याने खाली जाणाऱ्या सिटीबसमध्ये खचाखच प्रवासी भरुन वाहतूक केली जात आहे. महापालिकेच्या वतीने 90 सिटीबस सुरु आहे त्यांच्या फे-या वाढल्याने मनपाच्या उत्पन्नात वाढ होताना दिसत आहे.

आज 16 रिक्षा संघटना, लोडींग रिक्षा संघटना, संघर्ष वाहनचालक संघटनांनी चक्काजामची हाक दिल्यानंतर ऑटोरिक्षा चालकांनी प्रतिसाद देत बंदमध्ये सहभाग घेतला.

दुपारी 12 वाजता बाबा पेट्रोल पंप येथील चौकात रिक्षाचालक शेकडोंच्या संख्येने जमा झाले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. येथील 16 रिक्षा युनियनचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. हा पायी मोर्चा बाबा पेट्रोल पंप, सेंट्रल बसस्थानक, भडकलगेट, टाऊनहाॅल मार्गे अण्णाभाऊ साठे चौक येथून हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धडकला. हिट अँड रन कायदा मागे घ्यावा व विविध मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना सादर केले.

विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे हिट एण्ड रन कायदा तात्काळ बंद करण्यात यावा. महानगरपालिकेकडून रिक्षा चालकांना थांबा उपलब्ध न झाल्याने आर्थिक ऑनलाईन चलनाचा भुर्दंड माफ करण्यात यावा. ऑनलाईन पावती बंद करा. स्मार्ट सिटी बस ग्रामीण भागातील फे-या तात्काळ बंद करावे. ऑटो रिक्षा चालू असलेले नविन परवाने तात्काळ बंद करणे. बॅटरी रिक्षा यांना परवाण्याची सक्ती करणे. विना परवाण्याची बॅटरी रिक्षांची आरटीओ कार्यालयामधून पासिंग बंद करणे. महानगरपालिका तर्फे रिक्षा पिक अप आणि ड्राॅप पाॅईंट तसेच शेअरिंग मार्किंग फलक रुटनूसार अधिकृत करण्यात यावे. आरटीओ कार्यालयांतर्गत एजंट कडून होणारी लूट बंद करण्यात यावी. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रतिनिधी आरटीओ कार्यालयात नेमणूक करण्यात यावी. परवाना नुतनीकरण करण्यासाठी फायनान्स कंपनीचे एनओसीची अट आरटीओ कार्यालयामधून रद्द करणे. आरटीओ अधिकारी नेमणूक प्रभारी असल्याने ती नियुक्ती कायमस्वरूपी करण्यात यावी. 

यावेळी सलिम खामगांवकर, एड अभय टाकसाळ, शेख लतिफ, संघर्ष वाहन संघटनेचे संजय हळणोर, अज्जूभाई , मोहंमद बशीर, निसार अहमद खान, इम्रान पटेल, प्रकाश हेडगे, मनोज जैस्वाल, बिसन लोधे, बाळासाहेब किर्तीकर, इरफान शहा, सुरेश जाधव, वसिम खान, शेख परवेझ, अमजद खान, दत्ता नागरे, फेरोज खान, नईम पठाण, अनिता ताई कटकुरे, जमील वडोदकर, शेख अमजद, सलिम खान, अजहर इनामदार आदी उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow