रिल्सच्या नादात युवतीला गमवावा लागला जीव, सुलीभंजन येथील घटना...!
 
                                रिल्सच्या नादात युवतीला गमवावे लागला जीव...! सुलीभंजन येथील घटना...
खुलताबाद,दि.17(डि-24 न्यूज ) खुलताबाद तालुक्यातील
सुलीभंजन दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रिल्स बनविणाऱ्या युवतीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना घडली.
दुपारी दोनच्या सुमारास कार दरीत कोसळल्याने युवतीला जीव गमवावा लागला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील मयत युवतीचे नाव श्वेता दिपक सुरवसे, वय 23 वर्षे राहणार हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) असे आहे. या बाबत अधिक सविस्तर माहिती अशी श्वेता व तिचा मित्र सुरज संजय मुळे वय 25 रा.हनुमान नगर हे औरंगाबाद येथुन टोयाटो इटिऑस गाडी क्रमांक एम.एच.21,बी.एच.0958 ने खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते. या ठिकाणी मोबाईल वर रिल्स बनवितांना तिने मित्राला सांगितले की मी पण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअरवर पाय पडुन एक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन अंदाजी तीनशे फुट खाली पडून गाडी चकणाचूर झाली असून यात या युवतीचा मृत्यु झाला.
सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असुन,पावसाळ्यात तो निसर्ग सोंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात,अशातच हे दोघेजण गुरुवारी (ता.17) फिरायला आले,मोबाईलवर रिल्स बनवित असतांना घात झाला,मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती. असे येथील नागरिकांनी सांगित
 
ले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            