रोशनगेटवर कॅन्डल मार्च, दिल्या आतंकवाद मुर्दाबादच्या घोषणा...!
 
                                रोशनगेटवर कॅन्डल मार्च, दिल्या आतंकवाद मुर्दाबादच्या घोषणा...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात 28 भारतीय हुतात्मा झाले आहे. देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट पसरली आहे. आतंकवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. रोशनगेटवर एसडिपिआयच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढून मोदी-शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. हे सरकार हिंदू-मुस्लिम प्रत्येक घटनेत करुन राजकीय पोळी भाजत आहेत. पहेलगामच्या घटनेत एक मुस्लिम पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी हुतात्मा झाला. अनेक मुस्लिम युवक पर्यटकांना दिलासा देत होते जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते या मिडीया दाखवत नाही. फक्त हिंदू मुस्लिम करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे ज्वलंत मुद्दे बाजूला सारून आतंकी घटनेवर राजकारण केले जात आहे. हे या घटनेत शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत करावी, घटनेची सखोल चौकशी करून आतंकवाद्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी एसडिपिआयचे जिल्हाध्यक्ष साकी अहमद यांनी यावेळी केली आहे.
यावेळी प्रदेशाचे नेते युसुफ पटेल, जिल्हा सचिव शेख नदीम, डॉ.हाफीज इम्रान, शेख अलीम, हाफिज समीऊल्लाह, हाफिज अबुजर, अब्दुल अजीज आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            