वंचितने 11 उमेदवारांची केली घोषणा, रावेर मधून तृतीयपंथी शमिभा, नांदेडमधून फारुख अहमद, औरंगाबाद पूर्व विकास दांडगे

 0
वंचितने 11 उमेदवारांची केली घोषणा, रावेर मधून तृतीयपंथी शमिभा, नांदेडमधून फारुख अहमद, औरंगाबाद पूर्व विकास दांडगे

वंचितने 11 उमेदवारांची केली घोषणा, रावेर मधून तृतीयपंथी शमिभा, नांदेडमधून फारुख अहेमद, औरंगाबाद पूर्व विकास दांडगे

मुंबई, दि.21(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुक-2024 साठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी 11 उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली आहे. निवडणूकीची घोषणा होण्याच्या अगोदर उमेदवारांची घोषणा करण्यात या पक्षाने आघाडी घेतली आहे. तिस-या आघाडीत आंबेडकर जातील अशी चर्चा होती परंतु बोलणीच्या अगोदर त्यांनी उमेदवारांची घोषणा केली. तिस-या आघाडीत आंबेडकर जाणार किंवा नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू व मनोज जरांगे यांच्यासोबत तिसरी आघाडीची चर्चा होती. या यादीची विशेषतः हि आहे सर्व जाती धर्मातील उमेदवारांना त्यांनी तिकीट दिले आहे आणि विशेष म्हणजे रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नांदेड दक्षिण मधून फारुख अहमद, औरंगाबाद पूर्व मधून नवीन चेहरा विकास रावसाहेब दांडगे, सिंदखेडराजा सविता मुंडे, वाशिम मेघा किरण डोंगरे, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा विनय भांगे, धामणगाव रेल्वे विधानसभा निलेश विश्वकर्मा, साकोला डॉ.अविनाश रघुनाथ नन्हे, लोहा शिवा नरंगले, शेगांव किसन चव्हाण , खानापूर संग्राम कृष्णा माने यांची नावे पहील्या यादीत जाहीर केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow