वंचित, काँग्रेसच्या गटनेतेपदी अफसरखान यांची निवड...!

 0
वंचित, काँग्रेसच्या गटनेतेपदी अफसरखान यांची निवड...!

वंचितच्या गटनेतेपदी अफसरखान यांची निवड...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 4 नगरसेवक निवडून आले होते तर काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका निवडून आल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून आज संयुक्त लोकसेवा विकास आघाडी गट स्थापन करून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे गटनोंदणी केली आहे. गटनेतेपदी वंचितचे नगरसेवक अफसरखान यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले शहराच्या विकासात्मक मुद्दे सभागृहात उचलून नागरीकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्याचा निर्धार या नगरसेवकांनी यावेळी केला. 

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या संयुक्त 'लोकसेवा विकास आघाडी'च्या गट नेतेपदी वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जनहिताच्या कामांना गती देण्यासाठी ही आघाडी स्थापन केली असून, त्याचे नेतृत्व आता अफसर खान यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

या निवड यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी वंचितचे नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेविका झरीना जावेद कुरेशी, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, काँग्रेसच्या नगरसेविका मलेका हबीब कुरैशी, वंचितचे पश्चिम निरीक्षक योगेश बन, मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे जावेद कुरेशी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow