वादळ वा-यासह पावसाची शक्यता, नागरीकांनी सतर्क राहावे, नियंत्रण कक्षाचा इशारा

 0
वादळ वा-यासह पावसाची शक्यता, नागरीकांनी सतर्क राहावे, नियंत्रण कक्षाचा इशारा

शहरात मुसळधार सरी, धबधबा वाहून निघाला

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.18(डि-24 न्यूज) काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. 

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) व ठाणे जिल्ह्यात तीन तासांतकरीता वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाच्या मुसळधार तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तरी नागरीकांनी सतर्क राहावे असा इशारा मंत्रालयातील नियंत्रण कक्षाने दिली आहे. वातावरण निसर्गरम्य झाले तरी पर्यटनस्थळ औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, वेरुळ लेणी परिसरातील धबधबे वाहून निघाले. हे चित्र बघण्यासाठी आज पर्यटकांनी गर्दी केली होती. लोणावळा घटनेनंतर सरकारने पर्यटनस्थळ व धबधब्यावर जाताना आपली व कुटुंबाची काळजी घेत सतर्क राहण्यासाठी आवाहन केले आहे. निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचे असल्यास नियमांचे पालन करावे. जीवाचा धोका पत्करु नये. अशा ठिकाणी सेल्फी व फोटो घेवू नये. पाण्याचा अंदाज घ्यावा. लहान मुलांना तेथे घेऊन जावू नये

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow