विद्यापीठात विद्यार्थी संघटनेत राडा, राड्याचा व्हिडिओ व्हायरल

 0
विद्यापीठात विद्यार्थी संघटनेत राडा, राड्याचा व्हिडिओ व्हायरल

फलकावरील महापुरुषांची नावे मिटवून ठिकठिकाणी विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा...

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची कुलगुरूंकडे मागणी, आंबेडकरी विद्यार्थी व एबिव्हिपि विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ परिसरात झालेल्या वाद विवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 

विद्यापीठाच्या परिसरात अभाविप या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 100 ठिकाणी अभाविप, ABVP हे शब्द लिहीत ठिकठिकाणी विद्यापीठाच्या भिंती, फलक यांचे विद्रुपीकरण केले असून महात्मा फुले - डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्राच्या फलकावरील महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांच्या नावावर स्प्रे च्या माध्यमातून रंग लावत ही नावे मिटविण्याचा प्रयत्न केला असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून विद्रुपीकरण करणाऱ्या कडून नुकसान भरपाई वसूल करावी अन्यथा अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला रंगविण्यात येऊन यांना पाठीशी घातल्यास विद्यापीठ प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने प्र. कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे देण्यात आला.

विद्यापीठ परिसरात आंबेडकरी विद्यार्थी व एबिव्हिपि विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वाद विवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एबिव्हिपि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी विद्यार्थी चोप देताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेना पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी व रिपब्लिकन बहुजन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फलकावरील महापुरुषांची नावे मिटवून ठिकठिकाणी विद्रुपीकरण करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

       प्र कुलगुरु शिरसाठ यांच्या बोलताना अभाविप ही संघटना समतेच्या विचारांची विरोधक असून महापुरुषांच्या बाबत द्वेष पासरविण्यासाठी कुप्रसिद्ध आहे याची या पूर्वीची उपद्रवी कृत्य पाहता विद्यापीठातील महामानवांचे पुतळे व विविध महापुरुषांच्या नावे असणाऱ्या फलकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला असल्याने या बाबत कठोर भूमिका घ्यावी दरवर्षी अश्या प्रकारे विद्रुपीकरण होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

    विद्यापीठ प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारीच या संघटनेला जाणीवपूर्वक पाठबळ देत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून सदरील प्रकरणातही एक उच्चपदस्थ अधिकारी मध्यस्थी करून या कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत विद्यापीठ प्रशासन या बाबत किती गंभीर आहे या बाबत शंका उपस्थित केली.

      विद्यापीठाच्या परिसराचे विद्रुपीकरण करणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, विद्यापीठाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या रंगरंगोटी ची नुकसान भरपाई घ्यावी व सुरक्षेच्या कामात कुचराई करणाऱ्या सुरक्षा एजन्सी वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सचिन निकम, गुणरत्न सोनवणे ,कुणाल भालेराव, अँड अतुल कांबळे ,प्रवीण हिवराळे, सागर ठाकूर, विश्वजित गायकवाड, राहुल वडमारे, अमित घनगाव, संदीप तुपसमिंद्रे आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow