विधानपरिषदेच्या चार जागेसाठी 26 जून रोजी मतदान, 1 जुलै रोजी मतमोजणी...!
राज्यातील विधान परिषद निवडणूक घेण्याचे नवीन वेळापत्रक निवडणूक आयोगाने केले जाहीर
मुंबई, दि.24(डि-24 न्यूज ) भारतीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.
चार परिषद मतदारसंघात 10 जून रोजी निवडणूक घेण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता परंतु सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांच्या आक्षेपामुळे निवडणूक आयोगाने तो पुढे ढकलला होता.
आता निवडणूक आयोगाने शुक्रवारी मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या 4 जागांसाठी निवडणूक घेण्याचा नवा कार्यक्रम जारी केला आहे.
विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे 2 जुलै 2017 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.
नवीन वेळापत्रकानुसार या निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी जारी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार 7 जून 2024 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी 10 जून रोजी केली जाईल, तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 12 जून आहे, या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदानाचा वेळ असेल. 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक 5 जुलै रोजी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले
आहे.
What's Your Reaction?