विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात, भीमसागर उसळला...!

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात, भीमसागर उसळला....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने आज सोमवारी सकाळी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर सर्वपक्षीय व्यासपीठावर मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, माजी महापौर रशीद मामु, इब्राहिम पठाण सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवीनसिंग ओबेराय यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसच्या वतीने संविधानाचे वाचन करत अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष युसुफ शेख, एक्बालसिंग गिल, इब्राहिम पठाण, आमेर अब्दुल सलिम, अनिस पटेल, मोईन इनामदार, रेखाताई राऊत, प्रा.शिलवंत व गोपनारायण आदी उपस्थित होते. क्रांतीचौक ते भडकलगेट, टिवी सेई,ढी
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रविण पवार, निवासीत उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी देखील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसारच लोकशाही मार्गाने देश चालतो. म्हणून या संविधानाचे रक्षण करणे हे तुमची व आमची जबाबदारी आहे संविधान बदलणार असल्याची भाषा केली जाते. परंतु त्यात अजिबात तथ्य नाही संविधान बदलण्याचा कोणाच्या बापात दम नाही, असे प्रतिपादन मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एकजूट होऊन लढावे लागेल. असे म्हणत जयंतीनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाजी कवडे, विजय कांबळे, पृथ्वीराज पवार, यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भडकल गेट येथे विविध पक्ष संघटनांसह हजारोंच्या संख्येने आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दरम्यान विविध सेवाभावी संस्थांनी अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांना नाश्ता, शितपेय, पाणी बॉटलचे वाटप केले तसेच काहींनी अन्नदान केले.
शिंदे गटाच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष गजानन मनगटे, राहुल सोनवणे, महेंद्र सोनवणे, गजानन बारवाल, पुष्पा जाधव आदींची अभिवादन मंचावर उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवरांनी बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. वंचितच्या वतीने सिध्दार्थ मोकळे, योगेश बन, अफसरखान, तय्यब जफर, जावेद कुरेशी यांनी अभिवादन केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एड अभय टाकसाळ व सहका-यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत जयंती साजरी केली.
वकील संघाची रॅली
जयंती निमीत्त शहरातून विविध परिसरातून दुचाकी रॅली निघाल्या. यात लक्ष वेधून घेतले ते जिल्हा वकील संघाच्या दुचाकी रॅलीने. वकील संघाच्या वतीने जिल्हा कोर्टापासून भडकल गेट पर्यंत दुचाकी रॅली काढून महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मिलींद पाटील, सचिव अॅड. तिर्थराज चावरे, उपाध्यक्ष अॅड. सुनिल पडुळ यांच्यासह 250 ते 300 वकीलांनी या दुचाकी रॅलीत सहभाग नोंदवला.
क्रांतीचौक ते भडकलगेट, टिवी सेंटर व शहरातील विविध भागातून भव्य मिरवणूक ढोल ताशे व डिजेच्या गजरात भडकलगेट येथे रात्री उशिरापर्यंत जयंतीचा जल्लोष व बाबासाहेबांचा जयघोष सुरू होता. निळे गुलाल उधळत मिरवणूक पुढे
सरकत होत्या.
What's Your Reaction?






