वेरुळ लेणी येथे मल्टिमीडिया चित्र प्रदर्शन व माध्यम प्रतिनिधी वार्तालाप
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम;
वेरूळ लेणी येथे उद्या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन व माध्य़म प्रतिनिधी वार्तालाप
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज):- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो छत्रपती संभाजीनगर, पत्र सूचना कार्यालय मुंबई, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त वेरूळ लेणी परिसर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर 2024 दरम्यान दोन दिवशी मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात भारतातील महत्त्वाची पर्यटन स्थळे व वारसा स्थळांची माहिती चित्र आणि संक्षिप्त स्वरुपात देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्यातीने देशातील पर्यटन स्थळांना चालना व या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही या प्रदर्शनात देण्यात येत आहे.
प्रदर्शन स्थळी एलईडी वॉलद्वारे चित्रफितींच्या माध्यमातून पर्यटन स्थळे व पर्यटनाच्या विकास योजनांची माहिती देण्यात येईल. प्रदर्शन स्थळी दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना सेल्फी काढण्यासाठी डिजिटल सेल्फी पॉईंट व 360 डिग्री सेल्फी पॉइंटची सूविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन स्थळे व केद्र सरकारद्वारे पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना व वारसा स्थळांचे संवर्धन व विकास या विषयी सामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी मुंबई येथील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाद्वारे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी पत्रकार व माध्यम प्रतिनिधिसांठी वार्तालापाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत, सर्व नागरिक, पर्यटक व विद्यार्थी यांच्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधिक्षण पुरातत्वविद् डॉ. शिवकुमार भगत, पत्र सूचाना कार्यालयाच्या उप संचालिका जयदेवी पुजारी स्वामी, तहसिलदार स्वरुप कंकाळ, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दूसाने, प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधिकारी प्रशांत सोनोने,राजेश वाकळेकर, सहायक प्रसिध्दी अधिकारी विकास तापकीर व विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत.
सर्व नागरिकांनी व पर्यटकांनी भेटी द्याव्यात असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये यांनी केले आहे.
What's Your Reaction?