शहराच्या विकासासाठी साथ द्या, मतदारांनो मत द्या - प्रदीप जैस्वाल
 
                                शहराच्या विकासासाठी साथ द्या, मतदारांनो मत द्या - प्रदीप जैस्वाल
प्रदीप जैस्वाल यांचे एकतानगर येथील पदयात्रेदरम्यान आवाहन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)
शहराच्या विकासासाठी मतदारांनी एक होत मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन मध्य मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी श्रीपादनगर, एकतानगर, वानखेडेनगर परिसरात काढलेल्या पदयात्रेदरम्यान केले. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद परिसरातील नागरिकांनी दिला.
प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील श्रीपादनगर, एकतानगर, वानखेडेनगर आणि रामेश्वरनगरी परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. याला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला. मोठ्या प्रमाणात या पदयात्रेत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. "जय भवानी,जय शिवाजी, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला" अश्या घोषणा देत ही पदयात्रा निघाली होती. ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढत पदयात्रेचे स्वागत केले. युवकांनी फटाके फोडत, ढोल-ताशे वाजवत उत्साह निर्माण केला. यावेळी प्रदीप जैस्वाल यांनी बोलताना नागरिकांना आवाहन केले, "शहराच्या विकासासाठी सर्वांना एकत्र येऊन मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या एका मताने शहराच्या भविष्यात मोठा फरक पडू शकतो. जैस्वाल यांनी मतदारांना समजावले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी मतदान हे आवश्यक आहे." या पदयात्रेला अभिजीत देशमुख, रंगनाथ राठोड, राज वानखेडे, नंदकिशोर वाकेकर, युवराज वाकेकर, रामलाल बकले, विश्वनाथ राजपूत, संजय साळुंके, आशुतोष दाभाडे, धीरज पवार, शुभम गवंडर, अनिल सोनवणे, शिरसाठ, संगीता बोरसे, आशा बरसावणे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            