शहरातील महापालिका पथविक्रेता सदस्य निवडणुक प्रक्रीयेला उच्च न्यायालयाची स्थगिती, 25 जूलै रोजी होणार होते मतदान...!
छत्रपती संभाजीनगर महापालिकापथविक्रेता निवडणूक प्रक्रियेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती
25 जुलै रोजी होणारे मतदान पुढील आदेशापर्यंत रद्द...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेत्यांसाठी (फेरीवाले) आयोजित करण्यात आलेली बहुप्रतिक्षित निवडणूक प्रक्रिया मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. येत्या 25 जुलै 2026 रोजी होणारे मतदान आता पुढील आदेशापर्यंत होणार नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन) अधिनियम 2016 मधील नियम 14 (2) अंतर्गत 8 विविध प्रवर्गातील पथविक्रेत्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने 29 जून 2026 रोजी वर्तमानपत्रांमध्ये रीतसर निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला होता. या कार्यक्रमानुसार 25 जुलै 2026 (शनिवार) रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार होते.उच्च न्यायालयाची स्थगिती दरम्यान, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती (Stay) दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता उच्च न्यायालयाचा पुढील अंतिम आदेश किंवा निर्देश येईपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 8 प्रवर्गांतील नोंदणीकृत व संबंधित पथ विक्रेत्यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाची आणि निवडणूक स्थगितीची नोंद घ्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?